राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण (NDMA) यांच्या मार्गदर्शनाखाली 2016 पासून देशभरात “Up Scaling Aapda Mitra” ही योजना प्रायोगिक तत्वावर राबविण्यात आली आहे. या योजनेअंतर्गत आपत्ती काळात तात्काळ मदत करणाऱ्या स्वयंसेवकांची (आपदा मित्र) तुकडी तयार केली जाते. या योजनेच्या यशस्वी अंमलबजावणीमुळे स्थानिक प्रशासनास आपत्ती व्यवस्थापनात मोठी मदत होत आहे.
याच पार्श्वभूमीवर, लातूर जिल्ह्यात 300 आपदा मित्रांना आपत्ती व्यवस्थापनाचे विशेष प्रशिक्षण देण्यात येणार आहे. या प्रशिक्षणासाठी महाविद्यालयीन विद्यार्थी/विद्यार्थिनी, NCC/NSS विद्यार्थी, स्वयंसेवी संस्था (NGO), आशा, पोलिस पाटील, कोतवाल, अंगणवाडी सेविका, होमगार्ड, पोलीस, महाराष्ट्र सुरक्षा बल, खाजगी सुरक्षा रक्षक तसेच शासकीय/निमशासकीय कर्मचारी यांचा समावेश करण्यात येणार आहे.
प्रशिक्षणाचा कालावधी व लाभ:
1. 12 दिवसांचे मोफत निवासी प्रशिक्षण
2. आपत्कालीन बचाव कार्यासाठी विशेष किट
3. ₹5 लाखांचा विमा संरक्षण
4. अधिकृत प्रमाणपत्र
आपदा मित्र निवडीचे निकष
1. अर्जदार हा भारताचा नागरिक व लातूर जिल्ह्याचा रहिवासी असावा.
2. शारीरिक व मानसिक दृष्ट्या सक्षम असावा.
3. वय 18 ते 45 वर्षांच्या दरम्यान असावे.
लातूर जिल्ह्यातील इच्छुकांनी खालील लिंकवर जाऊन आपले नाव नोंदवावे:
नोंदणी लिंक: https://forms.gle/UK5H4qWg1mXkEfVPA
किंवा खालील QR कोड स्कॅन करून लिंक वर जाऊन नोंदणी करावी.
अधिक माहितीसाठी जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण, जिल्हाधिकारी कार्यालय, लातूर यांच्याशी संपर्क साधावा.