बंद

संजय गांधी निराधार अनुदान योजना

पात्र लाभार्थी – सर्वसाधारणपणे समाजातील निराधार व्यकती म्हणजे ज्या व्यकती स्वत:चा उदरनिर्वाह करु शकत नाहीत.उदा.अपंग,अनाथ,दुर्धर रोग ग्रस्त्,विधवा स्त्रिया,एच.आय.व्ही ग्रस्त,अत्याचारीत महीला,वेश्याव्यवसायातून मुक्त केलेल्या महीला,35 वर्षावरील अविवाहीत महीला इ.लाभ देण्यात येतो

उत्पन्न मर्यादा – कुटूंबाचे एकूण वार्षिक उत्पन्न रु.21000 /- किंवा त्यापेक्षा कमी असणे आवश्यक आहे
या योजनेअंतर्गत लाभार्थ्याची मुले 25 वर्षाची होईपर्यत किंवा नोकरी मिळेपर्यत (शासकीय/निमशासकीय/खाजगी) यामध्ये जे अगोदर घडेल तोपर्यत लाभार्थ्याना लाभ देण्या येतो
लाभार्थ्याना फक्त मुलीच असतील तर अशा लाभार्थ्याच्या बाबतीत मुलीचे वय 25 वर्षै झाले अथवा त्यांना नोकरी लागली किंवा त्यांचे लग्न होऊन त्या नांदावयास गेल्या तरी सुध्दा लाभ चालु राहील

आवश्यक कागदपत्रे– *वयाचा दाखला * रहीवासी दाखला * किमान 15 वर्षापासून महाराष्ट्र राज्याचा रहिवासी * दुर्धर आजाराबाबत जिल्हा शल्यचिकित्सक (सिव्हील सर्जन)/शासकीय रुग्णालयांच्या वैदयकीय अधीक्षकयांचा दाखला * उत्पन्नाचा दाखला/द्रारीद्रय रेषेखालील कुटूंबाच्या यादीमध्ये समावेश असल्याचा साक्षांकीत उतारा

शाखा/विभागा अंतर्गत करण्यात येणा-या कामाचा तपशिल –

आर्थीक सहाय्य् – समाजातील 65 वर्षे वयोगटाखालील वर नमूद केलेल्या प्रवर्गातील लाभार्थ्यास 600 /- प्रति महीना अर्थसहाय्य 65 वर्षे वयोमर्यादेपर्यत देय आहे

संजय गांधी निराधार अनुदान योजना (पीडीफ, 4.37 MB)

Project Details

  • पत्ता: गावातील तलाठी तसेच तहसिल कार्यालय
  • संपर्क व्यक्ती: अधिक माहीतीसाठी गावातील तलाठी तसेच तहसिल कार्यालयात सपंर्क साधावा