बंद

श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्तीवेतन अनुदान योजना

पात्र लाभार्थी – राज्यातील 65 व 65 वर्षावरील निराधार वृध्द व्यकतींना मासिक निवृत्तीवेतन देण्याच्या मूळ हेतूने श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्तीवेतन येाजना राबविण्यात येते

आवश्यक कागदपत्रे – *वयाचा दाखला * रहीवासी दाखला * उत्पन्नाचा दाखला

पात्रतेचे निकाष/अटी – 15 वर्षापासून महाराष्ट्र राज्याचा रहीवासी असणे आवश्यक. वय -65 व 65 वर्षापेक्षा अधिक,कुटूंबाचे नाव ग्रामीण / शहरी भागाच्या द्रारीद्रय रेषेखालील कुटूंबाच्या यादीत समाविष्ट असावे किंवा कुटूंबाचे वार्षिक उत्पन्न रुपये 21000 /- पर्यत असावे

शाखा/विभागा अंतर्गत करण्यात येणा-या कामाचा तपशिल –

आर्थीक सहाय्य – राज्यातील 65 व 65 वर्षावरील द्रारीद्रयरेषेखालील कुटूंबाच्या यादीत नाव असलेल्या निराधार स्त्री व पुरषांना केंद्र शासनाच्या इंदीरा गांधी राष्ट्रीय वृध्दापकाळ निवृत्तीवेतन योजनेमधून प्रतिमाह रुपये 200 /- निवृत्तीवेतन देण्यात येते.तसेच या योजनेस पुरक असलेल्या राज्य शासनाच्या श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्तीवेतन योजनेमधून प्रतिमाह रुपये 400/- इतके निवृत्तीवेतन देण्यात येते म्हणजेच प्रतिमा 600 इतके वेतन देय आहे.याला श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्तीवेतन योजना गट अ म्हणतात
श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्तीवेतन योजना गट ब ही योजना जे खरोखर गरजू निराधार वृध्द आहेत मात्र द्रारीद्रय रेषेखालील यादी मध्ये ज्यांची नोंद नाही व त्यांच्या कुटूंबाचे वार्षिक उत्पन्न रुपये 21000 /- पर्यंत असेल तर अशा वृध्दांना संपूर्ण रुपये 600 /- इतके श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्तीवेतन योजना गट ब मधून देय आहे

श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्तीवेतन अनुदान योजना (पीडीफ,4.4 MB)

Project Details

  • पत्ता: गावातील तलाठी तसेच तहसिल कार्यालय
  • संपर्क व्यक्ती: अधिक माहीतीसाठी गावातील तलाठी तसेच तहसिल कार्यालयात सपंर्क साधावा