महसूल दिन व महसूल सप्ताह २०२३
“महसूल दिन साजरा करणे व महसूल सप्ताह शुभारंभ”
दिनांक ०१.०८.२०२३ रोजी महसूल दिन व महसूल सप्ताह कार्यक्रम
आज दिनांक ०१.०८.२०२३ रोजी महसूल दिन व महसूल सप्ताह कार्यक्रम जिल्हा स्तरावर घेण्यात आला. सदर कार्यक्रमास या कार्यालयाचे परिपत्रक दिनांक २५.०७.२०२३ अन्वये सर्व समन्वय अधिकारी जिल्हा लातूर यांनी यशस्वीरित्या कामे केली. सदर कार्यक्रमात प्राथनिधीक स्वरुपात शासकीय योजना, संगायो/राष्ट्रीय कुटुंब अर्थसहाय योजना, मतदान ओळखपत्र, रहिवास प्रमाणपत्र, शिधापरित्रका, तलाठी स्थायित्व प्रमाणपत्र तसेच शेतकरी आत्महत्याग्रस्त कुटुंबियांना मदत त्याचप्रमाणे गोठा जळाले बाबतचे मदतीचे वाटप करण्यात आले. सदर लाभार्थी यांना मदतीबरोबर एक फळझाडही वाटप करण्यात आले. त्याचबरोबर वर्ष २०२२-२३ मध्ये महसूल विभागातील अतिउत्कृष्ट काम करणारे कोतवाल ते उपजिल्हाधिकारी संवर्ग या सर्व संवर्गाचे कर्मचारी/अधिकारी यांना उत्कृष्ट कामाबद्दल सन्मानपत्र, स्मृतीचिन्ह व एक पुस्तक तसेच एक रोपटे देण्यात आले.
दुपारच्या सत्रात अधिकारी/कर्मचारी कोतवाल संवर्ग ते उपजिल्हाधिकारी संवर्ग व त्यांचे कुटुंबिय यांचे मनोरंजनासाठी तसेच सुप्त कलागुणांना वाव मिळावा या हेतूने छोटेखानी सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित करण्यात आला ज्यामध्ये कर्मचा-यांच्या कुटुंबियांनाही उत्स्फुर्त सहभाग नोदविला.
“महसूल दिन साजरा करणे व महसूल सप्ताह शुभारंभ”
“युवा संवाद”
आज दिनांक 2/ 8/ 2023 रोजी महसूल सप्ताह निमित्त शासन परिपत्रक दिनांक 25/ 7/ 2023 अन्वये जिल्हास्तरावर तसेच प्रत्येक तालुकास्तरावर युवा संवाद हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला. जिल्हाधिकारी स्तरावरील कार्यक्रमात जिल्हाधिकारी लातूर, श्रीमती वर्षा ठाकूर घुगे यांनी स्वतः मार्गदर्शन केले. त्याचबरोबर नवीन मतदार ओळखपत्र वाटप केले. शैक्षणिक विषयक मार्गदर्शन, स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन आणि महसूल कामकाजाची पद्धत याबद्दल युवकांशी संवाद साधून मार्गदर्शन करण्यात आले. युवा संवादा अंतर्गत मीडियाचा मोबाईलचा गैरवापर त्या अनुषंगिक कायदे, तरतुदी आणि गांभीर्य याबद्दल पोलीस प्रशासनातर्फे सखोल मार्गदर्शन करण्यात आले आणि युवकांना गैरप्रकार टाळण्याबद्दल आवाहन करण्यात आले. सदर कार्यक्रमांतर्गत उपजिल्हाधिकारी निवडणूक यांनी निवडणूक प्रक्रिया, याबद्दलही माहिती दिली.धन्यवाद.
“महसूल दिन साजरा करणे व महसूल सप्ताह शुभारंभ”
“एक हात मदतीचा”
एक हात मदतीचा या कार्यक्रमांतर्गत अहमदपूर तालुक्यात अंतर्गत धनादेश वाटप संजय गांधी या योजनेचे प्रमाणपत्र,पासबुक,शिधापत्रिका वाटप करण्यात आल्या. निलंगा तालुक्यात मा.अपर जिल्हाधिकारी लातूर यांच्या अध्यक्षतेखाली एक हात मदतीचा कार्यक्रम घेण्यात आला. सदर कार्यक्रमास समन्वय अधिकारी उपविभागीय अधिकारी यांची उपस्थिती होती. सदर कार्यक्रमात स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाचे श्री डॉ.प्रमोद पाटीलयांचे व्याख्यान आयोजित करण्यात आले होते. तसेच नैसर्गिक आपत्ती धनादेश शिधापत्रिका व सातबारा वाटप करण्यात आले. नदीकाठच्या नागरिकांना नैसर्गिक आपत्ती माहिती पुस्तक वाटप व मार्गदर्शन करण्यात आले. सदर कार्यक्रमास श्याम पाटील यांनी मार्गदर्शन केले. उदगीर येथे मूकबधिर शाळेमध्ये एक हात मदतीचा कार्यक्रमांतर्गत मूकबधिर मुलांना शालेय साहित्य आणि खाऊचे वाटप करण्यात आले. रेणापूर तालुक्यामध्ये शिधापत्रिका विविध दाखले सातबारा वाटप करण्यात आले. औसा तालुक्यात उपविभागीय अधिकारी औसा रेणापुर यांचे हस्ते नैसर्गिक आपत्तीचे धनादेश आत्महत्याग्रस्त कुटुंबीयांना शिधापत्रिका महात्मा ज्योतिबा फुले योजनेचे प्रमाणपत्र तसेच संजय गांधी योजनेचे प्रमाणपत्र वाटप करण्यात आले. जळकोट तालुक्यात जिल्हा पुरवठा अधिकारी लातूर यांच्या उपस्थितीत एक हात मदतीचा कार्यक्रमांतर्गत शेतकरी आत्महत्याग्रस्त कुटुंबीयांना शासन निर्णयान्वये १ लाखाचा चेक तसेच निराधार योजनेचे उत्पन्नाचे प्रमाणपत्राचे वाटप करण्यात आले. सदर कार्यक्रम लातूर जिल्ह्यामध्ये प्रत्येक तालुक्यात मा. जिल्हाधिकारी लातूर श्रीमती वर्षा ठाकूर घुगे यांचे मार्गदर्शनानुसार विहित नियोजनानुसार उत्स्फूर्तपणे घेण्यात आला. सर्व कार्यक्रमांना नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. धन्यवाद.
“महसूल दिन साजरा करणे व महसूल सप्ताह शुभारंभ”
“जनसंवाद- नाते विश्वासाचे”
महसूल सप्ताह निमित्त आज 4/8/23 रोजी “”जनसंवाद- नाते विश्वासाचे” हे अभियान लातूर जिल्ह्यात राबवण्यात आले. सदर योजनेअंतर्गत सलोखा अभियानात लातूर जिल्ह्यातील पहिले लाभार्थी श्रीमती सुनिता दयानंद सपकाळ व मुकुंद चंद्रकांत माने यांच्या जमीन अदलाबदलीचे दस्त माननीय अपर जिल्हाधिकारी लातूर श्री सुनील यादव यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या कार्यक्रमात वितरित करण्यात आले. सदर कार्यक्रमास उपविभागीय अधिकारी औसा, उपाधीक्षक भूमी अभिलेख औसा, तहसीलदार औसा आणि नागरिक उपस्थित होते. याच कार्यक्रमात लाभार्थ्यांना मिळकतीची सनद, मोजणी नकाशे, फेरफार अदालती मध्ये मंजूर फेरफार, संजय गांधी निराधार योजनेचे मंजूर प्रमाणपत्र त्याचबरोबर रेशन कार्ड वाटप करण्यात आले. जळकोट येथे नकाशावरील रस्ते अतिक्रमण मुक्त करण्यात आले. चाकूर शिरूर अनंतपाळ आणि अहमदपूर येथे जनसंवाद कार्यक्रमांतर्गत फेरफार अदालत घेऊन दूर फेरफार चे सातबारा, आठ वाटप करण्यात आले. सलोखा योजनेअंतर्गत शिरूर अनंतपाळ येथील कार्यक्रमात एका प्रकरणास मान्यता देण्यात आली. चाकूर येथे भूमी अभिलेख कार्यालयाचे सहाय्याने ड्रोन द्वारे मोजणी झालेल्या सनदा वाटप करण्यात आल्या. उदगीर येथे जनसंवाद कार्यक्रमांतर्गत शासकीय योजनेचे स्टॉल लावून योजना निहाय उपस्थित नागरिकांना मार्गदर्शन करण्यात आले, ईपीक पाहणी, शेत रस्ते आणि संभाव्य नैसर्गिक आपत्ती व बचाव याबाबत मार्गदर्शन करून शेत रस्ते खुले करण्यात आलेले आदेश,7/12, राशन कार्ड, रहिवासी प्रमाणपत्र, उत्पन्न प्रमाणपत्र व जात प्रमाणपत्र वाटप करण्यात आले. जनसंवाद नाते विश्वासाचे अंतर्गत आज तहसील कार्यालय लातूर येथे कर्मचारी अधिकारी यांचे आरोग्य तपासणी शिबिर आयोजित करण्यात आले. सदर शिबिरास अप्पर जिल्हाधिकारी लातूर माननीय सुनील यादव, उपविभागीय अधिकारी लातूर, तहसीलदार लातूर हे उपस्थित होते. तपासणी शिबीर अंतर्गत 127 अधिकारी कर्मचारी यांचे आरोग्य तपासणी करण्यात आली.संपूर्ण जिल्ह्यामध्ये माननीय जिल्हाधिकारी श्रीमती वर्षा ठाकूर घुगे यांचे मार्गदर्शना प्रमाणे सर्व समन्वय अधिकारी यांनी आपापल्या नेमून दिलेल्या कार्यक्षेत्रात जनसंवाद नातेविश्वासाचे हा कार्यक्रम यशस्वीरित्या पूर्ण केला. सदर महसूल सप्ताहास व्यापक प्रसिद्धी दिली गेल्याने नागरिकांचा उत्साही सहभाग आढळून आला. धन्यवाद.
“महसूल दिन साजरा करणे व महसूल सप्ताह शुभारंभ”
” सैनिक हो तुमच्यासाठी “
आज दिनांक 5/8/ 2023 रोजी महसूल सप्ताह निमित्त जिल्हाधिकारी कार्यालय लातूर येथे ” सैनिक हो तुमच्यासाठी ” या जिल्हास्तरावर कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. हा कार्यक्रम समन्वय अधिकारी उपविभागीय अधिकारी रेणापूर औसा जिल्हा लातूर यांनी आयोजित केला होता. सदर कार्यक्रमास जिल्हाधिकारी लातूर श्रीमती वर्षा ठाकूर घुगे या अध्यक्षस्थानी होत्या. सैनिक हो तुमच्यासाठी या कार्यक्रमाचे जिल्हास्तरीय नियोजन असल्याने संपूर्ण जिल्ह्यातून माजी सैनिक, वीर पत्नी, वीर माता, वीर पिता, शौर्य पदक प्राप्त सैनिक व कुटुंबीय तसेच नागरिक मोठ्या प्रमाणात उपस्थित होते. कार्यक्रम स्थळी सन्माननीय निमंत्रितांसाठी देशभक्तीपर गीताचा सुंदर कार्यक्रम आयोजित करण्यात आला. सदर कार्यक्रमास महाराष्ट्र गीताने सुरुवात झाली. त्यानंतर सैनिकांसाठी “हर करम अपना करेंगे ए वतन तेरे लिए ” गीत गायला गेलं ज्यामध्ये उत्स्फूर्तपणे सन्माननीय निमंत्रितांनी देखील भाग घेतला. त्यानंतर त्यांचे सन्मानार्थ “मला जिजाऊ सावित्री रमा माता तुमच्या मध्ये दिसावी ” हे सुंदर गीत प्रस्तुत झाले… सैनिक हो तुमच्यासाठी या कार्यक्रमांमध्ये जिल्हास्तरीय माजी सैनिक, वीरमाता पिता , वीर पत्नी, शौर्य पदक धारक सैनिक व कुटुंबीय, यांना माननीय जिल्हाधिकारी लातूर श्रीमती वर्षा ठाकूर घुगे यांचे हस्ते पुष्पगुच्छ, पुष्पहार, शाल देऊन यथोचित गौरव करण्यात आला. कार्यक्रम दरम्यान जिल्हा सैनिक कार्यालय लातूर यांचेकडून माझी सैनिक यांचे पाल्यांचे शिष्यवृत्तीचेमंजूर धनादेश अध्यक्ष जिल्हाधिकारी लातूर श्रीमती वर्षा ठाकूर घुगे आणि निमंत्रित त्यांच्या हस्ते वाटप करण्यात आले. अध्यक्षायी मार्गदर्शनामध्ये लातूर श्रीमती वर्षा ठाकूर घुगे यांनी शासनाने सदर कार्यक्रमाचे नियोजन सैनिकांच्या सन्मानासाठी केला असल्याचे नमूद करून जिल्ह्यातल्या प्रत्येक तहसील उपविभाग आणि जिल्हाधिकारी कार्यालय येथे प्रत्येक मंगळवारी दुपारी बारा ते एक या कालावधीमध्ये सैनिकांचे काही अडचण असेल, प्रलंबित कामे असतील तर या वेळेमध्ये सर्व अधिकाऱ्यांनी वेळ जाहीर राखीव ठेवून सैनिकांचे प्रश्न सोडवण्यास प्राधान्य दयावे अशा जाहीर सूचना दिल्या. तसेच इतरही सर्व कार्यालयांमध्ये कामकाजाच्या वेळेला सैनिक, माजी सैनिक वा कुटुंबीय यांनी भेट दिल्यास त्यांना नियमानुसार काम करून द्यावे, सेवा तत्पर देण्यास ताकीद दिली.कार्यक्रमास उपस्थित असलेले माजी सैनिकांनी मनोगत व्यक्त केले ज्यामध्ये शासनाने एक दिवस सैनिकांसाठी ठेवला, सैनिकांची आठवण ठेवली आणि सन्मानाने आम्हाला येथे बोलवून आमचे यथोचित सन्मान केले, उत्साहवर्धक देशभक्तीपर गीतांचा कार्यक्रम आयोजित केला… आणि हे पहिल्यांदा झाले याबाबत शतशः धन्यवाद मानून आभार व्यक्त केले. सदर ठिकाणी सन्मान कार्यक्रमाबरोबरच जिल्हाधिकारी लातूर श्रीमती वर्षा ठाकूर घुगे यांचे हस्ते उपस्थित नागरिकांनाराशन कार्ड, रहिवास प्रमाणपत्र, संजय गांधी निराधार मंजुरीचे प्रमाणपत्र, फेरफार मंजुरीचे सातबारा इत्यादी ही वाटप करण्यात आले. सदर कार्यक्रमास जिल्ह्यातील सर्व अधिकारी, कर्मचारी, पत्रकार उपस्थित होते. शेवटी आभार प्रदर्शन उपविभागीय अधिकारी औसा रेणापूर श्री अविनाश कोरडे यांनी केले आणि राष्ट्रगीताने सुंदर देशभक्तीपर कार्यक्रमाची सांगता झाली. धन्यवाद. 💐
“ महसूल सप्ताह सांगता समारोह”
आज दिनांक 7/8/ 2023 रोजी जिल्हाधिकारी कार्यालय लातूर येथे महसूल सप्ताह निमित्त महसूल विभागातील कार्यरत व सेवानिवृत्त /अधिकारी कर्मचारी संवाद आणि महसूल सप्ताह सांगता समारोह एकत्रित घेण्यात आला. सदर कार्यक्रम जिल्हास्तरीय घेण्यात आला. या कार्यक्रमास जिल्हाभरातील कार्यरत व सेवानिवृत्त व सेवानिवृत्त अधिकारी कर्मचारी मोठ्या प्रमाणात उपलब्ध होते. सदर कार्यक्रमास मा. जिल्हाधिकारी लातूर श्रीमती वर्षा ठाकूर घुगे यांचे मार्गदर्शनाखाली उपविभागीय अधिकारी अहमदपूर श्री प्रवीण फुलारी यांनी आयोजित केले. सदर कार्यक्रमास सकाळच्या सतरा मध्ये सर्व अधिकारी कर्मचारी यांच्यासाठी आरोग्य तपासणी शिबिर आयोजित करण्यात आले होते. आरोग्य शिबिरामध्ये मधुमेह थायरॉईड रक्तदाब डोळे दात इत्यादीची तपासणी आणि मार्गदर्शन आयोजित केले होते तसेच कर्मचारी अधिकारी नागरिक यांनी रक्तदान करण्याचे आव्हान जिल्हाधिकारी लातूर श्रीमती वर्षा ठाकूर घुगे यांनी केले होते त्यामुळे रक्तदान शिबिराचे ही आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रम स्थळी ध्वज विक्री केंद्र उभारणी करण्यात आली होती. सदर केंद्राचे उद्घाटन जिल्हाधिकारी लातूर श्रीमती वर्षा ठाकूर घुगे यांच्या हस्ते झाले. सदर उद्घाटन कार्यक्रमास मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद लातूर माननीय श्री.अनमोल सागर परीक्षाविधीन IAS माननीय श्री.नमन गोयल तसेच अप्पर जिल्हाधिकारी लातूर माननीय सुनील यादव यांची उपस्थिती लाभली होती. ध्वजदीन केंद्रामध्ये माननीय जिल्हाधिकारी यांनी उपस्थित कर्मचारी अधिकारी यांना ध्वज विकत घेण्याच्या सूचना करून प्रातनिधिक स्वरूपात ध्वज विक्री करण्यात आले. कार्यक्रमा दरम्यान मंजूर 248 कर्मचारी पैकी काही कर्मचाऱ्यांना सातव्या वेतन आयोगानुसार सुधारित सेवांतर्गत आश्वासित प्रगती योजनेचा पहिला दुसरा व तिसरा लाभ मंजूर करण्यात आला. तसेच महसूल सहाय्यक वाहन चालक शिपाई संवर्गातील कर्मचाऱ्यांना जिल्हाधिकारी लातूर यांच्या हस्ते स्थायित्व प्रमाणपत्र वाटप करण्यात आले. कार्यरत कर्मचाऱ्यांपैकी रास्त कार्य पद्धतीने जे कर्मचारी मराठी हिंदी भाषा सूट यात बसत होते त्या कर्मचाऱ्यांना हिंदी भाषा सूट प्रमाणपत्र वितरित करण्यात आले. तसेच माननीय जिल्हाधिकारी लातूर श्रीमती वर्षा ठाकूर घुगे यांचे सूचनेनुसार महसूल सहाय्यक ते अव्वल कारकून संवर्गात पदोन्नती देऊन आदेश निर्गमित करण्यात आले. कर्मचारी अधिकारी यांचे संवाद कार्यक्रमात माननीय जिल्हाधिकारी लातूर यांचे सूचनेनुसार जिल्हा लातूर येथील कार्यरत सर्व उपजिल्हाधिकारी यांनी प्रत्येकी एक विषय घेऊन त्याबाबत सर्व उपस्थित कर्मचारी अधिकारी यांना मार्गदर्शन केले. ज्यामध्ये उपविभागीय अधिकारी निलंगा यांनी संवाद कौशल्य याविषयी मार्गदर्शन केले. उपविभागीय अधिकारी अहमदपूर श्री प्रवीण फुलारी यांनी कार्यालयीन कार्यपद्धतीमध्ये अभिलेख हे सिक्स बंडल सिस्टीम मध्ये कशाप्रकारे लावले पाहिजे याबद्दल सखोल मार्गदर्शन केले. उपविभागीय अधिकारी लातूर यांनी कामकाज करताना तसेच जीवन जगताना सकारात्मक दृष्टिकोन किती आवश्यक आहे याबद्दल मार्गदर्शन करून एखादा छंद जोपासण्यास आवाहन केले. उपजिल्हाधिकारी निवडणूक लातूर यांनी कार्यरत कर्मचारी अधिकारी आणि आपल्या कुटुंबातील सदस्यांचे आणि आपले स्वतःचेही मानसिक आरोग्य कशाप्रकारे आपण चांगले ठेवू शकू याचे मार्गदर्शन करून मानसिक आरोग्याचे जर काळजी घेतली नाही तर काय परिणाम होतात याचे सखोल मार्गदर्शन केले. तसेच जिल्हा पुरवठा अधिकारी लातूर यांनी कामकाज करत असताना किंवा समाजामध्ये जगत असताना आपले स्वतःचे व्यक्तिमत्व आपली वैचारिक पातळी कसे सुदृढ ठेवता येईल याबाबत मार्गदर्शन केले…. सदर कार्यक्रमास माननीय जिल्हाधिकारी लातूर श्रीमती वर्षा ठाकूर घुगे यांनी शासन स्तरावरून महसूल दिन व महसूल सप्ताह या कार्यक्रमाचे आयोजनाची रूपरेषा विदित करून शासन स्तरावरूनच त्यातही दिवसांमध्ये बहुतांश विषय आणि व्यक्ती यांचे सुंदर नियोजन केल्याचे नमूद करून सदर कार्यक्रम पूर्ण उत्साहाने, शासन व नागरिक यांचे समन्वयाने परिपूर्ण केल्याबद्दल समाधान व्यक्त केले. तसेच फक्त सप्ताह पुरता हा कार्यक्रम किंवा त्याचे उद्देश नसून कार्यक्रमांमध्ये विधीत केलेले आणि कार्यक्रमादरम्यान जिल्हाधिकारी लातूर म्हणून मी केलेल्या सूचनेनुसार प्रत्येक तहसीलदार/ उपविभागीय अधिकारी तसेच इतर कार्यालय प्रमुख यांनी दैनंदिन कामकाज करण्यास सूचना दिल्या. ज्यामध्ये प्रामुख्याने शासन आपल्या दारी, सुंदर माझे कार्यालय, गाव तेथे स्मशानभूमी, फेरफार अदालत, सलोखा योजना, ध्वज विक्री केंद्र तसेच वृक्षारोपणाचे कार्यक्रम, वृक्ष संवर्धन इत्यादी विषय स्वतः जिल्हाधिकारी लातूर यांचे अजेंड्यावर असल्याने सदर कामकाजाबाबत सर्व अधिकारी आणि त्यांच्या टीमने उत्सापूर्वक काम करण्याचे आवाहन केले.कामकाजा बरोबर वैयक्तिक आपले आरोग्य जपण्याच्या सूचना केल्या. कार्यक्रमादरम्यान एक ते सात तारखेपर्यंत चे सर्व कार्यक्रमाची प्रसिद्धी ही नागरिकांमध्ये असल्याने आणि नागरिकही उत्स्फूर्तपणे सहभागी असल्याने नागरिकांकडून सदर कार्यक्रमाबाबत समाधान व्यक्त केले जात आहे हे नमूद केले. तसेच हर घर तिरंगा अभियानांतर्गत सर्व घरांवर ध्वज फडकवण्याच्या सूचना करून सदर घरातील स्त्री, आई मुलगी पत्नी किंवा सून यांच्या हस्ते फडकविण्या चे आवाहन केले. सदर कार्यक्रमाची सांगता राष्ट्रगीताने झाली. धन्यवाद.