बंद

प्रधान मंत्री TB मुक्त भारत अभियान-निक्षय मित्र

निक्षय मित्र नोंदणी साठी लिंक –  www.nikshay.in

उपक्रमाचे नांव व उदिदष्ट – प्रधानमंत्री टीबी मुक्त भारत अभियान हा उपक्रम ०९सप्टेंबर २०२२ रोजी औपचारी करित्या सुरुवात करण्यात आली. या दिवशी मा.राष्ट्रपती श्रीमती द्रोपदीमुर्मू यांनी डिजिटल स्वरुपात या अभियानाचे उदधाटन केले अणि निक्षयमित्र उपक्रमाची ही सुरुवात केली

  • पोषण आहाराचा प्रमुख उददेश –

१. कुपोषणाची जोखिम कमी करणे.

२.उपचार कालावधीतील सहनशक्ती वाढविणे.

३.रुग्णांचा बरा होण्याचा वेग वाढविणे.

४. उपचार सोडून देण्याचे प्रमाण कमी करणे.

५.   आरोग्य दायी समाज निर्मितीस मदत

लाभार्थीकोण ?

  • सर्व नोंदणी कृत क्षयरुग्ण (प्रत्येकवयोगटातील,शासकीय / खाजगी क्षेत्रातून)
  • एमडीआर / एक्सडीआर क्षय रुग्णयांचा समावेश.

३.निक्षयमित्र कोण बनु शकतो?

  • सीएसआर (Corporate Social Responsibility)दानशुर व्यक्ती किंवा सामाजिक संस्था इत्यादी यांच्या कडून प्रत्यक्ष क्षय रुग्ण व त्यांच्या कुटुंबास उपचार कालावधी मध्ये पोषण आहार किटचे वाटप करणे साठीआवाहन करण्यात येतआहे.
  • वाढदिवस,विशेष दिनी पोषणआहार किट वितरण केलेजातात.
  • “पोषण देवू,क्षयरोग हरवू” !

पोषण आहार किट विवरण प्रतिमहा

विवरण प्रतिक्षयरुग्ण / प्रतिमहा प्रतिकिटअंदाजेकिंमत (रुपये) प्रतिमहा सहा महिने करीता सहा किट प्रमाणे
तांदुळ/गहु/ज्वारी ३किलो १५० ९००
डाळ १.५किलो २७० १६२०
खाद्यतेल २५०ग्राम ५० ३००
दुधपावडर/दुध/शेंगदाने १किलो/६लिटर/१किलो ११० ६६०
एकूण ५८० ३४८०

 

निक्षयमित्रनोंदणीसाठीलिंक –  www.nikshay.in

 

१. जिल्हयात सद्य स्थितीत एकूण १७९२ क्षय रुग्ण उपचारावर असून आजपर्यंत ४३५ रुग्णांना एकूण ६५१

पोषण आहार किटचे वितरण केले आहे. अद्याप १३५७ रुग्णपोषण आहाराच्या प्रतिक्षेत आहेत.

२. लातूर जिल्हयातील अमंल बजावणी यत्रंणा –

  • जिल्हाक्षयरोग अधिकारी, जिल्हाक्षयरोग केंद्र, लातूर.
  • तालुका आरोग्य अधिकारी, कार्यालय, (सर्व)

कार्यालय : जिल्हा क्षयरोग कार्यालय, जुनी मध्यवर्ती प्रशासकीय इमारत,

शिवाजीचौक,लातूर–४१३५१२.

दुरध्वनीक्रमांक :- ०२३८२२५२४५५ ई-मेल . dtomhltr@rntcp.org

संपर्क – डॉ.एस.एन. तांबारे,जिल्हाक्षयरोगअधिकारीमो.नं. ९६८९३५४१६९

श्री.सुबोधमगरे,जिल्हा कार्यक्रम समन्वयक,मो.नं. ९७३०५२६७६४

श्री.ए.एफ.गाझी,पीपीएम समन्वयक,मो.नं.  ९४२३३५१७८६